Please enable Javascript...

आमच्याबद्दल | बद्दल | मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था
  • ईमेल mspspune28@gmail.com
  • फोन नं (02169) 265255
  • मुख्यपृष्ठ
  • बद्दल
    • आमच्याबद्दल
    • बक्षिसे आणि पुरस्कार
    • कार्यकारी मंडळ
  • शाळा आणि वसतिगृहे
    • समता प्राथमिक आश्रमशाळा
    • समता माध्यमिक आश्रमशाळा
    • समता कनिष्ठ महाविद्यालय
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.2
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3
    • बालगृह
  • प्रवेश
  • सामाजिक उपक्रम
  • गॅलरी
  • देणगीदारांसाठी माहिती
  • संपर्क
  • English Website

आमच्याबद्दल

  1. मुख्यपृष्ठ
  2. बद्दल
  3. आमच्याबद्दल

संस्थेविषयी माहिती

समाजातील  भटक्या विमुक्त जाती व जमाती, अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग या मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी त्यांना दर्जेदार  शिक्षण मिळावे या उदात्त हेतून सन 1980 साली  मांगल्य शिक्षण प्रसारक  संस्था, पुणे-28  या संस्थेची  कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी स्थापना केलेली आहे. शासनाच्या तत्कालीन समाज कल्याण विभागांतर्गत प्रथम लोणंद येथे समता प्राथमिक आश्रमशाळा सुरू करून यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीमधील तसेच निराधार मुलांना प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संस्थेमार्फत सुरू करण्यात आले.

इ.7 वी नंतर पुढील शिक्षणाची गरज लक्षात घेता सन 1993 पासून समता माध्यमिक आश्रमशाळेची स्थापना करून समाजातील वंचित घटकांतील मुलामुलींना शिक्षण देण्याचा व त्या मुला-मुलींचे भावी आयुष्य उज्वल करण्याचे कार्य संस्थेमार्फत सुरू केले आहे. आजपर्यंत संस्थेतील या विद्यालयाने एस.एस.सी व एच.एस. सी परीक्षेच्या निकालाची उज्वल परंपरा राखली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर मुलभूत व चांगल्या सुविधा देवून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी वाढवून स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी व उदयाचे सक्षम नागरिक निर्माण करण्याचे कार्य संस्थेमार्फत अखंड चालू आहे. आश्रमशाळेमध्ये विमुकत जाती, भटक्या जमातीतील मुला- मुलींना निवास व शिक्षणाची सोय होत होती. परंतु मागासवर्गीय व इतर जातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करून कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी संस्थेमार्फत जिल्हा परीषद समाज कल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांची वसतिगृह सन 1988 पासून सुरू केली.

संस्थेने या प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयास सुसज्य इमारत, सुसज्य ग्रंथालय व अद्यावत प्रयोगशाळा या सुविधा उपलब्ध करून  दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगुन त्यासाठी सतत प्रयत्न केले जातात यासाठी विविध उपक्रमांतर्गत व्यक्तिमत्व विकास, क्रिडा स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. यामुळे अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण केले आहे. आश्रमशाळा व वसतिगृहासाठी सर्व सोयीयुक्त वसतिगृह इमारतींची उभारणी करून समाजातील गोरगरीब व शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या मुलां-मुलींना निवास व शिक्षणाची सोय केली. 

संस्थेने अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या विमुक्त संवर्गातील मुला-मुलींच्यासाठी तसेच निराधार मुला-मुलींच्यासाठी उत्तम अशी निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था केली आहे. या शिक्षण संस्थ्‍ोतील अनेक विद्यार्थी आज देशसेवा, डॉक्टर, इंजिनीअर,  वकील, शिक्षण, क्रिडा या क्षेत्रात चमकत आहेत.

समाजातील अनाथ, निराधार विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण व संगोपण याची गरज लक्षात घेवून महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने बालगृह सन 1992 साली सुरू केली.

अशा प्रकारे वंचित घटकांतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासात संस्था सतत प्रयत्न करीत आहे. त्यांचा विकास हाच संस्थेचा ध्यास आहे. कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे संस्थेच्या सर्वांगीण विकास या उद्देश प्राप्तीसाठी खर्ची केले.  

 

संस्थेची माहिती

1 संस्थेचे नाव मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28
2 स्थापना दिनांक दि. 30/05/1980
3 संस्थेचा पत्ता बिल्डिंग नं.3, फ्लॅट नं.31 इंद्रप्रस्थनगर, को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, सर्व्हे नं.4A/B गाडीतळ, हडपसर पुणे-411028.
4 संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र
5 संस्थेचे विभाग सातारा
6 संस्था नोंदणी क्रमांक MAH/439/Pune - 30/05/1980  (1860)
7 न्यास नोंदणी क्रमांक F-1514 (पुणे) – 25/07/1980  (1950)
8 FC (R)A क्र 083930613 / 14.08.2020
9 दर्पण नोंदणी क्र MH/2018/0190580
10 PAN AACTM2825K / 28.07.1986
11 TAN PNEM16265E / 25.04.2011
12 80G

URN: AACTM2825KE20221 / 30-01-2023
Period: AY 2023-24 to AY2025-26

13 FC (R) A बँक खाते क्र 04440200000142
14 ई-मेल आयडी mspspune28@gmail.com
15 वेबसाईट www.msamata.com
16 संपर्क व्यक्ती श्री.पवन आनंदा सुर्यवंशी- सचिव - 9890384002 / 9890123379

 

मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था

संस्थेने अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या विमुक्त संवर्गातील मुला-मुलींच्यासाठी तसेच निराधार मुला-मुलींच्यासाठी उत्तम अशी निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था केली आहे. या शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी आज देशसेवा, डॉक्टर, इंजिनीअर,  वकील, शिक्षण, क्रिडा या क्षेत्रात चमकत आहेत.

समाजातील अनाथ, निराधार विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण व संगोपण याची गरज लक्षात घेवून महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने बालगृह सन 1992 साली सुरू केली.

अशा प्रकारे वंचित घटकांतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासात संस्था सतत प्रयत्न करीत आहे. त्यांचा विकास हाच संस्थेचा ध्यास आहे. कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे संस्थेच्या सर्वांगीण विकास या उद्देश प्राप्तीसाठी खर्ची केले. 

संपर्क माहिती

  • मु.पो.पाडेगाव, ता.खंडाळा, जि.सातारा, महाराष्ट्र - 415521.
  • (02169) 265255
  • mspspune28@gmail.com

© 2025 मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था All rights reserved.

Designed & Developed By NSP Multiserve LLP

Facebook Page

Check Our Facebook Page

Email Us

Talk With Us Over Email

Call Us

(02169) 265255

Whats App

Admin : 919890123379