Please enable Javascript...

समता प्राथमिक आश्रमशाळा | शाळा आणि वसतिगृहे | मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था
  • ईमेल mspspune28@gmail.com
  • फोन नं (02169) 265255
  • मुख्यपृष्ठ
  • बद्दल
    • आमच्याबद्दल
    • बक्षिसे आणि पुरस्कार
    • कार्यकारी मंडळ
  • शाळा आणि वसतिगृहे
    • समता प्राथमिक आश्रमशाळा
    • समता माध्यमिक आश्रमशाळा
    • समता कनिष्ठ महाविद्यालय
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.2
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3
    • बालगृह
  • प्रवेश
  • सामाजिक उपक्रम
  • गॅलरी
  • देणगीदारांसाठी माहिती
  • संपर्क
  • English Website

समता प्राथमिक आश्रमशाळा

  1. मुख्यपृष्ठ
  2. शाळा आणि वसतिगृहे
  3. समता प्राथमिक आश्रमशाळा

||  प्रयत्नांती परमेश्वर ||

मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28 संचलित

समता प्राथमिक आश्रमशाळा, पाडेगांव ता.खंडाळा जि.सातारा

श्री. भोसले संदिप मोहन- प्र.मुख्याध्यापक मो.नं. 8055188877

सौ.अडागळे सुनिता तुषार - महिला अधिक्षिका - मो.नं. 9762372850

U-Dise Code- 27310506602

स्थापना- सन 1981

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मान्यताबाबतचा शासन निर्णय क्र-.व्हीअेअेस/1081/42166/डे.15 मंत्रालय विस्तारभवन, मुंबई-400032 दि.25/03/1981

सचिवालय- मा.प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-400032.

संचालनालय- मा.संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय 3 चर्च पथ महाराष्ट्र राज्य पुणे-411001.

विभागीय कार्यालय- मा.प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर मेंन्टल कॉर्नर येरवडा पुणे-411006.

जिल्हा कार्यालय-

मा.सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सातारा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा-415003

  1.  
  2.  
  3.  
Previous Next

मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28 या संस्थेने पुर्वी समाज कल्याण संचालनालय व आत्ताचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने सन 1981 पासून  लोणंद येथे प्रथम समता प्राथमिक आश्रमशाळा सुरू केली. सन 1989 साली पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा येथे जागा व इमारत उपलब्ध करून समता प्राथमिक आश्रमशाळा. पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा येथे स्थलांतरीत करण्यात आली. सध्या समता प्राथमिक आश्रमशाळेमध्ये इ.1 ली ते इ.4 थी चे वर्ग सुरू आहेत. प्राथमिक आश्रमशाळेमध्ये निवासी मान्य संख्या- 70 विद्यार्थी इतकी आहे. समता प्राथमिक आश्रमशाळेमध्ये निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्राथमिक विभागाठी 4 शिक्षक कार्यरत आहेत. समता प्राथमिक आश्रमशाळा वसतिगृह विभागासाठी 1 अधिक्षक, 1स्वयंपाकी, 1 मदतनीस व  1 कामाठी अशी 4 पदे वसतिगृह विभागामध्ये कार्यरत आहेत.

समता प्राथमिक आश्रमशाळा व वसतिगृहासाठी स्वतंत्र व सुसज्य अशी इमारत उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शिष्यवृत्ती,  क्रिडास्पर्धा व त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्यात येते. आश्रमशाळेसाठी स्वतंत्र वर्ग खोल्या, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच, ग्रंथालय, संगणक, पिण्यासाठी आर. ओ चे शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

समता प्राथमिक आश्रमशाळा वसतिगृह विभागामध्ये विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था यामध्ये अंथरून- पांघरून यांमध्ये कॉट, गादी, उशी, सतरंजी, चादर/ब्लॅकेट, भोजनाची भांडी यांमध्ये ताट, वाटी, पेला, शैक्षणिक साहित्य यांमध्ये पाठयपुस्तक, वही, पेन, पाटी, पट्टी, शिसपेन्सिल, खोडरबर, शॉपनर, दप्तर इत्यादी साहित्य मोफत पुरविण्यात येते. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश देण्यात येतात तसेच केसकर्तन, तेल, साबण, दंतमंजन, प्रथमोपचार, करमणूक व खेळाचे साहित्य पर्यायी विद्युत व्यवस्था, सुरक्षेतेसाठी सी.सी.टी.व्ही इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. पिण्यासाठी आर. ओ  चे शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

प्राथमिक आश्रमशाळेस सन 2003-04 मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्व आश्रमशाळेमधून समता प्राथमिक आश्रमशाळेला राज्यात प्रथम क्रमांकाचा सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राविण्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.

     अ) अध्यापक वर्ग

अ.क्र नाव शै.पात्रता नेमणूक तारीख जन्म तारीख पद
1 श्री.भोसले संदिप मोहन B.A,D.ed 06.02.2023 03.09.1991 प्र.मुख्याध्यापक
2 भंगारे गयाबाई शेषेराव B.A,D.ed 15.06.2023 02.05.1989 उपशिक्षिका

ब) वसतिगृह कर्मचारी वर्ग

अ.क्र नाव शै.पात्रता नेमणूक तारीख जन्म तारीख पद
1 श्री.भोसीकर सुनिल दशरथ SSC 08.07.2019 03.07.1983 स्वयंपाकी
2 श्री.दुधाळ सचिन विठ्ठल B.Com 13.02.2020 17.07.1992 मदतनीस
3 श्री.सुर्यवंशी संग्राम मरीबा SSC 01.04.2002 15.05.1975 कामाठी
मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था

संस्थेने अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या विमुक्त संवर्गातील मुला-मुलींच्यासाठी तसेच निराधार मुला-मुलींच्यासाठी उत्तम अशी निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था केली आहे. या शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी आज देशसेवा, डॉक्टर, इंजिनीअर,  वकील, शिक्षण, क्रिडा या क्षेत्रात चमकत आहेत.

समाजातील अनाथ, निराधार विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण व संगोपण याची गरज लक्षात घेवून महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने बालगृह सन 1992 साली सुरू केली.

अशा प्रकारे वंचित घटकांतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासात संस्था सतत प्रयत्न करीत आहे. त्यांचा विकास हाच संस्थेचा ध्यास आहे. कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे संस्थेच्या सर्वांगीण विकास या उद्देश प्राप्तीसाठी खर्ची केले. 

संपर्क माहिती

  • मु.पो.पाडेगाव, ता.खंडाळा, जि.सातारा, महाराष्ट्र - 415521.
  • (02169) 265255
  • mspspune28@gmail.com

© 2025 मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था All rights reserved.

Designed & Developed By NSP Multiserve LLP

Facebook Page

Check Our Facebook Page

Email Us

Talk With Us Over Email

Call Us

(02169) 265255

Whats App

Admin : 919890123379