Please enable Javascript...

बालगृह | शाळा आणि वसतिगृहे | मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था
  • ईमेल mspspune28@gmail.com
  • फोन नं (02169) 265255
  • मुख्यपृष्ठ
  • बद्दल
    • आमच्याबद्दल
    • बक्षिसे आणि पुरस्कार
    • कार्यकारी मंडळ
  • शाळा आणि वसतिगृहे
    • समता प्राथमिक आश्रमशाळा
    • समता माध्यमिक आश्रमशाळा
    • समता कनिष्ठ महाविद्यालय
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.2
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3
    • बालगृह
  • प्रवेश
  • सामाजिक उपक्रम
  • गॅलरी
  • देणगीदारांसाठी माहिती
  • संपर्क
  • English Website

बालगृह

  1. मुख्यपृष्ठ
  2. शाळा आणि वसतिगृहे
  3. बालगृह

||  प्रयत्नांती परमेश्वर ||

मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28 संचलित

बालगृह पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा.

कु.पुजा वैजिनाथ पवार - अधिक्षक - मो.नं 8432252484

स्थापना- सन 1992

1.मान्यता क्र.

1. 20 मुलांची प्रथम मान्यता-क्र.बाक.माक्षिरांपु/बालसदन योजनांतर्गत/मान्यता /952/91.92/का5, पुणे दि.25/03/1992

2.वाढीव 20 मुलांची मान्यता -क्र.माबाविस/बालसदन/योजनांतर्गत/अनुदान1993-94/1232/का-5 अ, पुणे दि.19/03/1994

3. वाढीव 20 मुलांची मान्यता -क्र.माबाविस/योजनेबालसदन/सुधारिकत तरतुदत /मान्यता/97-98/काअ/ योजनेत्तर/3436 पुणे दि.31/03/1998

4. महिला व बाल   विकास महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा मान्यतेबाबतचे नोंदणी  प्रमाणपत्र जा.क्र.मबाविआ/नों.प्र/09-10/115 दि.05/01/2010

5. महिला व बाल  विकास विभागाचा मान्यतेबाबतचा शासन निर्णय क्रमांक-जेजेए-2017/प्र.क्र.53 (भाग-2)/का-08  दि.8 मार्च, 2019 

आयुक्तालय-  मा.आयुक्त, महिला व बाल  विकास, महाराष्ट्र राज्य पुणे. 28 राणीचा बाग, जुने सर्किट हाऊस जवळ, पुणे- 411001

विभागीय आयुक्तालय- मा.विभागीय उपायुक्त,  महिला व बाल विकास, पुणे विभाग पुणे. 3 चर्च रोड, पुणे-411001

जिल्हा कार्यालय- मा.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस.टी.स्टँडजवळ सातारा

  1.  
  2.  
  3.  
Previous Next

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने बालगृह सन 1992 साली  बालगृह पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा येथे सुरू केली. महाराष्ट्र शासनाच्या बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,2015 नुसार संस्थेच्या बालगृहास प्रमाणपत्र प्राप्त झालेले असून नवीन नियमानुसार संस्थेचे बालगृह पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा येथे कार्यरत आहे. सदर बालगृहामध्ये राज्यपाल नियुक्त जिल्हा स्तरावरील बाल कल्याण समितीच्या आदेशाने समाजातील अनाथ मुलांना बालगृहामध्ये प्रवेश दिला जातो. बालगृहामध्ये वय वर्ष 6 ते 18 वर्षापर्यंत संगोपण केले जाते.

बालगृहातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था यामध्ये अंथरून- पांघरून यांमध्ये कॉट, गादी, उशी, सतरंजी, चादर/ब्लॅकेट, भोजनाची भांडी यांमध्ये ताट, वाटी, पेला, शैक्षणिक साहित्य यांमध्ये पाठयपुस्तक, वही, पेन, पट्टी, शिसपेन्सिल, खोडरबर, शॉपनर,कंम्पास, दप्तर इत्यादी साहित्य मोफत पुरविण्यात येते. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश, दोन इतर ड्रेस, टॉवेल, अंतरवस्त्र संस्थेमार्फत देण्यात येतात तसेच केसकर्तन, तेल, साबण, दंतमंजन, प्रथमोपचार, करमणूक व खेळाचे साहित्य पर्यायी विद्युत व्यवस्था, सुरक्षेतेसाठी सी.सी.टी.व्ही इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. पिण्यासाठी आर. ओ  चे शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

बालगृह पाडेगाव यांमध्ये 1 अधिक्षक, 1 स्वयंपाकी, 1 काळजीवाहक, 1 मदतनीस अशी 4  कर्मचारी कार्यरत आहेत.

बालगृह कर्मचारी वर्ग

अ.क्र कर्मचा-याचे नाव पद
1 कु.पुजा वैजिनाथ पवार अधिक्षक
2 श्रीमती.अंजना परशुराम धोत्रे स्वयंपाकी
3 सौ.सोनाली भिकाजी कांबळे काळजीवाहक
4 सौ.सत्वशिला सुनिल भोसीकर मदतनीस
मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था

संस्थेने अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या विमुक्त संवर्गातील मुला-मुलींच्यासाठी तसेच निराधार मुला-मुलींच्यासाठी उत्तम अशी निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था केली आहे. या शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी आज देशसेवा, डॉक्टर, इंजिनीअर,  वकील, शिक्षण, क्रिडा या क्षेत्रात चमकत आहेत.

समाजातील अनाथ, निराधार विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण व संगोपण याची गरज लक्षात घेवून महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने बालगृह सन 1992 साली सुरू केली.

अशा प्रकारे वंचित घटकांतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासात संस्था सतत प्रयत्न करीत आहे. त्यांचा विकास हाच संस्थेचा ध्यास आहे. कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे संस्थेच्या सर्वांगीण विकास या उद्देश प्राप्तीसाठी खर्ची केले. 

संपर्क माहिती

  • मु.पो.पाडेगाव, ता.खंडाळा, जि.सातारा, महाराष्ट्र - 415521.
  • (02169) 265255
  • mspspune28@gmail.com

© 2025 मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था All rights reserved.

Designed & Developed By NSP Multiserve LLP

Facebook Page

Check Our Facebook Page

Email Us

Talk With Us Over Email

Call Us

(02169) 265255

Whats App

Admin : 919890123379