Please enable Javascript...

समता माध्यमिक आश्रमशाळा | शाळा आणि वसतिगृहे | मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था
  • ईमेल mspspune28@gmail.com
  • फोन नं (02169) 265255
  • मुख्यपृष्ठ
  • बद्दल
    • आमच्याबद्दल
    • बक्षिसे आणि पुरस्कार
    • कार्यकारी मंडळ
  • शाळा आणि वसतिगृहे
    • समता प्राथमिक आश्रमशाळा
    • समता माध्यमिक आश्रमशाळा
    • समता कनिष्ठ महाविद्यालय
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.2
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3
    • बालगृह
  • प्रवेश
  • सामाजिक उपक्रम
  • गॅलरी
  • देणगीदारांसाठी माहिती
  • संपर्क
  • English Website

समता माध्यमिक आश्रमशाळा

  1. मुख्यपृष्ठ
  2. शाळा आणि वसतिगृहे
  3. समता माध्यमिक आश्रमशाळा

||  प्रयत्नांती परमेश्वर ||

मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28 संचलित

समता माध्यमिक आश्रमशाळा, पाडेगांव ता.खंडाळा जि.सातारा

श्री.माने उत्तम गणपत - प्र.मुख्याध्यापक - मो.नं. 9860331550

सौ.अडागळे सुनिता तुषार - महिला अधिक्षिका - मो.नं. 9762372850

School Index- 21.03.019    U-DISE Code- 27310506603

स्थापना- सन 1993

1.विना अनुदानित तत्वावर- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मान्यता क्र.व्ही.ए.एस/1092/प्र.125/ मा.व.क.-6 मंत्रालय विस्तारभवन, मुंबई-400032 दि.10/03/1993. पोस्ट बेसिक आश्रमशाळेस विना अनुदानित तत्वावर इ.8 वी ते 10 वी या वर्गास मान्यता.

2. अनुदानित तत्वावर- व्हीएएस/1094/प्र.क्र.90/मावक 6/मंत्रालय विस्तारभवन मुंबई-400032. दि.20/03/1995 च्या आदेशान्वये इ.8 वी ते 10 वी या वर्गास कायम मान्यता.

3. इ.8 वी ते 10 वी प्रति तुकडी 1 याप्रमाणे मान्यता- क्र.पुवि./आशा/पाडेगाव/1995-96/2580/विभागीय समाज कल्याण अधिकारी पुणे यांचे दि.16/08/1995 चा आदेश.

4.इ.5 वी ते इ.7 वी चे वर्ग माध्यमिक शाळेस जोडण्याबाबतचा आदेश क्र.शिक्षण/आशा/वर्गजोड/इ.5 वी ते 7 वी/प्राथ आशा/पाडेगाव/माध्य/2000-01/का-3/136 पुणे यांचा दि.12/02/2001 चा संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचा आदेश.

  1.  
  2.  
  3.  
Previous Next

5.इ.5 वी व इ.8 वी या वर्गास तुकडी वाढीस मान्यताबाबतचा शासन निर्णय क्र.विभशा-2002/प्र.क्र.166/मावक-6 मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-400032. दि.29/03/2003 चा आदेश.

6. इ.6 वी व इ.9 वी या तुकडीस नैसर्गिक वर्गवाढ  आदेश क्र- विजाभज/नियोजन/आशा/नैसर्गिक वाढ/पाडेगाव 2003-04/का-1/2287 दि.25/08/2003 चा संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचा आदेश.

इ.7.इ.6 वी, इ.7 वी, इ.9 वी व इ.10 च्या तुकडीस मान्यताबाबतचा शासन निर्णय क्र.विभशा-2006/प्रक्र149/मावक-6 मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-400032. दि.28/03/2008 चा आदेश.

सचिवालय- मा.प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-400032.

संचालनालय- मा.संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय 3 चर्च पथ महाराष्ट्र राज्य पुणे-411001.

विभागीय कार्यालय- मा.प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर मेंन्टल कॉर्नर येरवडा पुणे-411006

जिल्हा कार्यालय-

मा.सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सातारा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा-415003

 

मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28 या संस्थेने पुर्वी समाज कल्याण संचालनालय व आत्ताचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने सन 1993 पासून  पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा येथे समता माध्यमिक आश्रमशाळा. पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा येथे सुरू केली. सध्या समता माध्यमिक आश्रमशाळेमध्ये इ.5 वी ते इ.10 वी चे दोन तुकडयामध्ये वर्ग सुरू आहेत. प्रथम तुकडी ही सेमी इंग्रजी माध्यम व दुसरी तुकडी ही मराठी माध्यमातून वर्ग सुरू आहे. समता माध्यमिक आश्रमशाळेमध्ये निवासी मान्य संख्या- 170 विद्यार्थी इतकी आहे. समता माध्यमिक आश्रमशाळेमध्ये निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. माध्यमिक विभागासाठी 1 मुख्याध्यापक, 1 पर्यवेक्षक, 17 उपशिक्षक, 1 व.लिपीक, 1 क.लिपिक, 1 अर्ध.ग्रंथपाल, 1 प्र.सहाय्यक, 1 प्र.परिचर, 1 नाईक, 3 शिपाई अशी एकूण 28 कर्मचारी कार्यरत आहेत. समता माध्यमिक आश्रमशाळा वसतिगृह विभागासाठी 1 अधिक्षक, 2 स्वयंपाकी, 1 मदतनीस व 1 कामाठी अशी 5 पदे वसतिगृह विभागामध्ये कार्यरत आहेत.

समता माध्यमिक आश्रमशाळा व वसतिगृहासाठी स्वतंत्र व सुसज्य अशी इमारत उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा परीक्षा, चित्रकला परीक्षा, क्रिडास्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्यात येते. आश्रमशाळेसाठी स्वतंत्र वर्ग खोल्या, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच, ग्रंथालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा,क्रिडारूम, स्टाफरूम, मुख्याध्यापक कक्ष व कार्यालय उपलब्ध आहे.  पिण्यासाठी आर. ओ चे शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

समता माध्यमिक आश्रमशाळा वसतिगृह विभागामध्ये विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था यामध्ये अंथरून- पांघरून यांमध्ये कॉट, गादी, उशी, सतरंजी, चादर/ब्लॅकेट, भोजनाची भांडी यांमध्ये ताट, वाटी, पेला, शैक्षणिक साहित्य यांमध्ये पाठयपुस्तक, वही, पेन, पट्टी, शिसपेन्सिल, खोडरबर, शॉपनर,कंम्पास, दप्तर इत्यादी साहित्य मोफत पुरविण्यात येते. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश देण्यात येतात तसेच केसकर्तन, तेल, साबण, दंतमंजन, प्रथमोपचार, करमणूक व खेळाचे साहित्य पर्यायी विद्युत व्यवस्था, सुरक्षेतेसाठी सी.सी.टी.व्ही इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. पिण्यासाठी आर. ओ  चे शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

समता माध्यमिक आश्रमशाळेतील इ.10 वीतील विद्यार्थ्यांना राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्‍कार, मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, विजाभज प्रवर्गातील मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना लागू आहेत. खेळाडू विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय क्रिडा शिष्यवृत्तीची सुविधा असून इ.10 वी व 12 साठी 5 टक्के गुणग्रेड व इ.11 वी प्रवेशासाठी 5 टक्के खेळाडूंसाठी आरक्षण सोय आहे.

समता माध्यमिक आश्रमशाळेतील इ.10 वीच्या एसएससी बोर्ड परीक्षेच्या निकालाची उज्वल परंपरा आहे. तसेच क्रिडा विभागामार्फत घेण्यात येणा-या अनेक स्पर्धामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्ध्यांनी जिल्हास्तर, विभागस्तर तसेच राज्यस्तरावर अनेक बक्षिसे जिंकलेली आहे. 

अ)अध्यापक / शिक्षकेत्तर वर्ग

अ.क्र नाव शै.पात्रता नेमणूक तारीख जन्म तारीख पद
1 श्री.माने उत्तम गणपत B.A. B.P.Ed. 10.06.2002 01.06.1968 प्र.मुख्याध्यापक
2 श्री.नलवडे प्रदीप उत्तम     B.Sc. B.Ed. 10.06.1996 02.05.1970 पर्यवेक्षक
3 श्री.पाटोळे प्रल्हाद गंगाराम B.Sc. B.P.Ed. 12.06.1995 02.06.1968 उपशिक्षक
4 श्री.भोसले मिलींद सर्जेराव M.A. B.Ed 10.06.1996 02.06.1971 उपशिक्षक
5 श्री.गोवेकर रमेश वामन M.A. B.Ed. 10.06.1996 01.06.1966 उपशिक्षक
6 श्री.जाधव अशोक संपत B.A. B.Ed. 20.06.1992 01.06.1969 उपशिक्षक
7 कु.बिचुकले राजश्री आनंदराव M.Sc. B.Ed. 06.02.2023 14.02.1994 उपशिक्षक
8 श्री.बेस्के राजेंद्र सदाशिव M.A. B.Ed. 13.06.1995 07.05.1971 उपशिक्षक
9 श्री.सुर्यवंशी बळीराम नारायण SSC D.Ed. 11.06.1992 12.03.1968 उपशिक्षक
10 श्री.कवटे किसन मुरलीधर B.A. B.Ed. 09.06.2003 16.10.1977 उपशिक्षक
11 श्री.वाघमारे सुभाष महादेव SSC ATD AM 11.09.2003 15.04.1972 उपशिक्षक
12 श्री.सावंत ज्ञानदेव तुकाराम B.A. D.Ed. 10.06.2002 22.05.1977 उपशिक्षक
13 श्री.शिंदे विरसिंग नथुराम M.Sc. B.Ed. 08.06.2005 15.01.1979 उपशिक्षक
14 श्री.देवरे प्रविण बळवंतराव M.A. B.Ed. 08.06.2005 06.05.1980 उपशिक्षक
15 सौ.गायकवाड निता कमलाकर B.A. D.Ed. 08.06.2005 15.08.1984 उपशिक्षिका
16 श्री.वाघमारे मुकेश संभाजी B.A. D.Ed. 01.02.2009 22.05.1987 उपशिक्षक
17 श्री.स्वामी विरेंद्र राजेंद्र M.A.B.Ed 08.09.23 20.03.90 उपशिक्षक
18 श्री.खुडे तानाजी गंगाराम B.Com 12.06.1995 01.06.1967 प्र.सहाय्यक
19 श्री.टोणपे मिलिंद रामचंद्र M.A. B.Ed. 11.09.2001 29.11.1972 वरिष्ठ लिपीक
20 श्री.माने दिपक विठृठल BA B.Lib.LTD 11.09.2001 01.12.1975 अर्ध.ग्रंथपाल
21 श्री.मोरे अमरजित दिलीपराव BA 07.06.2007 31.01.1981 प्र.परिचर
22 श्री.कारंडे शंकर दशरथ 9th 12.06.1995 05.06.1970 नाईक
23 श्री.सुर्यवंशी प्रल्हाद गंणपती SSC 10.06.1996 20.05.1977 शिपाई
24 श्री.सुर्यवंशी पांडूरंग नारायण HSC 01.12.2001 10.04.1978 शिपाई
25 श्री.कोरडे दिपक बाळू 6th 01.06.2003 24.07.1983 शिपाई

ब) वसतिगृह कर्मचारी वर्ग

अ.क्र नाव शै.पात्रता नेमणूक तारीख जन्म तारीख पद
1 सौ.अडागळे सुनिता तुषार B.A. D.Ed. 03.10.2017 10.02.1981 महिला अधिक्षिका
2 कु.कांबळे भाग्यश्री तुकाराम 10 th 15.06.2023 08.09.1996 स्वयंपाकी
3 श्री.जाधव गणेश तुकारा 10 th 15.06.2023 09.03.1992 स्वयंपाकी
4 श्रीम. कोरडे वैजयंता बाळासो     साक्षर 10.06.1996 15.08.1970 मदतनीस
5 श्री.गजले बापुराव संभाजी HSC 09.06.1997 01.04.1975 कामाठी
मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था

संस्थेने अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या विमुक्त संवर्गातील मुला-मुलींच्यासाठी तसेच निराधार मुला-मुलींच्यासाठी उत्तम अशी निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था केली आहे. या शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी आज देशसेवा, डॉक्टर, इंजिनीअर,  वकील, शिक्षण, क्रिडा या क्षेत्रात चमकत आहेत.

समाजातील अनाथ, निराधार विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण व संगोपण याची गरज लक्षात घेवून महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने बालगृह सन 1992 साली सुरू केली.

अशा प्रकारे वंचित घटकांतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासात संस्था सतत प्रयत्न करीत आहे. त्यांचा विकास हाच संस्थेचा ध्यास आहे. कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे संस्थेच्या सर्वांगीण विकास या उद्देश प्राप्तीसाठी खर्ची केले. 

संपर्क माहिती

  • मु.पो.पाडेगाव, ता.खंडाळा, जि.सातारा, महाराष्ट्र - 415521.
  • (02169) 265255
  • mspspune28@gmail.com

© 2025 मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था All rights reserved.

Designed & Developed By NSP Multiserve LLP

Facebook Page

Check Our Facebook Page

Email Us

Talk With Us Over Email

Call Us

(02169) 265255

Whats App

Admin : 919890123379