Please enable Javascript...

मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3 | शाळा आणि वसतिगृहे | मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था
  • ईमेल mspspune28@gmail.com
  • फोन नं (02169) 265255
  • मुख्यपृष्ठ
  • बद्दल
    • आमच्याबद्दल
    • बक्षिसे आणि पुरस्कार
    • कार्यकारी मंडळ
  • शाळा आणि वसतिगृहे
    • समता प्राथमिक आश्रमशाळा
    • समता माध्यमिक आश्रमशाळा
    • समता कनिष्ठ महाविद्यालय
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.2
    • मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3
    • बालगृह
  • प्रवेश
  • सामाजिक उपक्रम
  • गॅलरी
  • देणगीदारांसाठी माहिती
  • संपर्क
  • English Website

मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3

  1. मुख्यपृष्ठ
  2. शाळा आणि वसतिगृहे
  3. मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3

||  प्रयत्नांती परमेश्वर ||

मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28 संचलित

मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3 पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा.

श्री.देवचे देवराम हनुमंत - अधिक्षक - मो.नं 9975523630

स्थापना- सन 2002

1. मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद सातारा यांचा आदेश क्र. सकअ/ जिप/सा/अनु.वगृह/ हस्तांतरण/917/फलटण/ पाडेगाव/2001.2002 सातारा चा दि.13/06/2002 च्या आदेशानुसार वसतिगृह पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा येथे सुरू करण्यास परवानगी मिळाली.

सचिवालय -  मा.प्रधान सचिव,  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-400032.

आयुक्तालय-  मा.आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे. 3 चर्च रोड, पुणे-411001

विभागीय कार्यालय- मा.प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण पुणे विभाग पुणे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर मेंन्टल कॉर्नर येरवडा पुणे-411006

जिल्हा कार्यालय- मा.जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, सातारा-कोरेगाव रोड, जिल्हा परिषद सातारा-415001

  1.  
  2.  
  3.  
Previous Next

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागांतर्गत इ.5 वी ते इ.12 वी च्या मागासवर्गीय मुलांसाठी चालविण्यात येणा-या निवासी वसतिगृह योजनेतून संस्थेने सन 2002 सालापासून  पाडेगाव ता. खंडाळा जि.सातारा येथे सुरू  केलेले आहेत.  मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3 पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा या वसतिगृहाची मान्य संख्या- 168 असून यामध्ये 60%  एस सी, 15% एस टी, विमुक्त जाती भटक्या जमाती 23%, विशेष मागास प्रवर्ग 7.5% व आर्थिकदृष्टया मागास 2.5% प्रमाणे जातीनिहाय  विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहातील  विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था यामध्ये अंथरून- पांघरून यांमध्ये कॉट, गादी, उशी, सतरंजी, चादर/ब्लॅकेट, भोजनाची भांडी यांमध्ये ताट, वाटी, पेला, शैक्षणिक साहित्य यांमध्ये पाठयपुस्तक, वही, पेन, पट्टी, शिसपेन्सिल, खोडरबर, शॉपनर,कंम्पास, दप्तर इत्यादी साहित्य मोफत पुरविण्यात येते. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश  संस्थेमार्फत देण्यात येतात तसेच केसकर्तन, तेल, साबण, दंतमंजन, प्रथमोपचार, करमणूक व खेळाचे साहित्य पर्यायी विद्युत व्यवस्था, सुरक्षेतेसाठी सी.सी.टी.व्ही इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. पिण्यासाठी आर. ओ  चे शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3 यांमध्ये 1 अधिक्षक, 2 स्वयंपाकी, 1 मदतनीस व 1 चौकीदार अशी 5  कर्मचारी कार्यरत आहेत.

वसतिगृह कर्मचारी वर्ग

अ.क्र कर्मचा-याचे नाव पद जन्म तारीख
1 श्री.देवचे देवराम हनुमंत अधिक्षक 27.02.1976
2 श्री.वाघमारे देविदास माणिकराव स्वयंपाकी 01.06.1975
3 सौ.रंजनाबाई दिलीप गुंडले स्वयंपाकी 01.01.1988
4 श्रीम.माने सुनिता चंद्रराव मदतनीस 20.07.1971
5 श्री.सुर्यवंशी विलास चंपती चौकीदार 01.01.1995

 

मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.3 पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा
मान्य विद्यार्थी संख्या = 168

 

अ.क्र संवर्ग विहीत केलेली टक्केवारी टक्केवारी प्रमाणे आरक्षित जागा
1 अनु.जाती 60% 84
2 अनु.जमाती 15% 21
3 विमुक्ती जाती/भटक्या जमाती 23% 32
4 विशेष मागास प्रवर्ग 2% 3
5 इतर मागास प्रवर्ग 72% 21
6 आर्थिकदृष्टया मागास प्रवर्ग 25% 7
  एकूण   168

 

मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था

संस्थेने अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या विमुक्त संवर्गातील मुला-मुलींच्यासाठी तसेच निराधार मुला-मुलींच्यासाठी उत्तम अशी निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था केली आहे. या शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी आज देशसेवा, डॉक्टर, इंजिनीअर,  वकील, शिक्षण, क्रिडा या क्षेत्रात चमकत आहेत.

समाजातील अनाथ, निराधार विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण व संगोपण याची गरज लक्षात घेवून महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने बालगृह सन 1992 साली सुरू केली.

अशा प्रकारे वंचित घटकांतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासात संस्था सतत प्रयत्न करीत आहे. त्यांचा विकास हाच संस्थेचा ध्यास आहे. कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे संस्थेच्या सर्वांगीण विकास या उद्देश प्राप्तीसाठी खर्ची केले. 

संपर्क माहिती

  • मु.पो.पाडेगाव, ता.खंडाळा, जि.सातारा, महाराष्ट्र - 415521.
  • (02169) 265255
  • mspspune28@gmail.com

© 2025 मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था All rights reserved.

Designed & Developed By NSP Multiserve LLP

Facebook Page

Check Our Facebook Page

Email Us

Talk With Us Over Email

Call Us

(02169) 265255

Whats App

Admin : 919890123379